Monday, September 21, 2009

पुणेरी चपराक

काही वेळेला " खोडी " काढायचं मनात नसतं . पण ग्राहकानं अनाठायी शंका विचारुन बेजार केलं तर " इरसाल पुणेरीउत्तराची " चपराक बसते . उदा .
शिट्टीवर सुरेल गाणं सादर करणारा मित्रवर्य अप्पा कुलकर्णी मुळात महाराष्ट्र बँकेत होता . त्याच्या बँकेसमोरचा रस्ता फक्त ओलांडायचा अवकाश , समोरच आणखी एक सहकारी बँक होती . तिथलाच " चेक " घेऊन आपल्यामहाराष्ट्र बँकेतल्या खात्यात भरण्यासाठी ग्राहक महाशय आले . नेमकं काउंटरवरच्या अप्पाला त्यांनी विचारलं . " कॅश कधी होईल ?"
अप्पा म्हणाला , " उद्या बँकेला सुट्टी आहे , परवा होईल ."
ग्राहाकानं विचारलं , " का पण ? समोरच्या बँकेचा तर चेक आहे . वेळ लागतोच कसा ?"
" अहो . उद्या सुट्टी आहे ...".. अप्पाचा नम्रपणा अद्याप सुटला नव्हता !
" पण समोरच तर बँक आहे ...." ग्राहक हेका सोडेना .

मग खट्याळ अप्पाला राहवेना . तो म्हणाला , " काका , काय आहे , केवळ रस्ता ओलांडल्यावरच्या बँकेचा चेक आहे म्हणुन लगेचच कॅश होतो असं नसतं . प्रोसिजर असते ... असं बघा ."
" काही सांगु नका , प्रोसिजर - बिसिजर !"

" ऐका तर काका ... वैकुंठ, स्मशानभुमीच्या दारातच .. समजा तुम्ही गेलात म्हणजे मेलात तर दारातच गेले म्हणुन सरणावर चढवतील का ? आधी ससुनला नेतील ... चेक करतील .. घरी नेतील .. हार घालतील .. म्रुत्यु पास काढतील .. मग वैकुंठकडे ..!!"

" कळलं ..!" फणकारत ग्राहक महाशय निघुन गेले। अशा इरसाल प्रश्नोत्तरामुळे किंवा " न " विचारता केलेल्या - नोंदविलेल्या प्रक्रियेमुळेच पुण्याचा जिवंतपणा टिकुन आहे ... पूणं कधी ' डल ' होत नाही ..!

Monday, December 31, 2007

पिक्चर

पहिला माणूसः माझ्या बायकोने प्रेग्नंट असताना सीता और गीता पिक्चर पाहिला आणि तिला जुळ्या मुली झाल्या..!

दुसरा माणूसः माझ्या बायकोने प्रेग्नंट असताना त्रिमुर्ती पिक्चर पाहिला आणि तिला तिळे मुलं झाले..!

तिसरा माणूसः अरे बापरे...! माझ्या बायकोने प्रेग्नंट असताना अलिबाबा आणि ४० चोर पिक्चर पाहिला आहे....!!!

Saturday, December 29, 2007

थंडी

पहिला मुलगाः माझे वडील इतक्या थंडीत गेले इतक्या थंडीत गेले की त्यांनी चहा केला की प्यायच्या आत त्याचा बर्फ होत असे..!
दुसरा मुलगाः माझे वडील इतक्या थंडीत गेले इतक्या थंडीत गेले की त्यांनी सू केली की सू ची कांडी होऊनचं बाहेर पडतं असे..!
तिसरा मुलगाः माझे वडील इतक्या थंडीत गेले इतक्या थंडीत गेले की ते काही बोलले की त्यांच्या तोंडामधून बर्फ पडतं असे. मग ते काय बोलले हे समजून घेण्यासाठी तो बर्फ तव्यावर ठेऊन वितळावा लागत असे...!!!

उंची

पहिला मुलगाः माझे वडील इतके उंच आहेत इतके उंच आहेत की ते मोठ्या झाडाची पाने हाताने तोडू शकतात..!
दुसरा मुलगाः माझे वडील इतके उंच आहेत इतके उंच आहेत की ते जिराफाच्या ढुंगणाची पप्पी घेऊ शकतात..!!
तिसरा मुलगाः माझे वडील इतके उंच आहेत इतके उंच आहेत की जिराफ त्यांच्या ढुंगणाची पप्पी घेऊ शकतो...!!!

Monday, May 14, 2007

कोके नंबर १

पत्र

आज आलेले एक Forward E-Mail...


ती. बाबा आणि सौ. आईस,

बंड्याचा शि. सा.न.वि . वि.

मी पुण्यात होस्टेलवर सुखरूप येऊन पोहोचलो. तुम्ही लगोलग मला बाईक घेऊन दिल्यामुळे माझी कॉलेजला आणि क्लासला जाण्याची मस्त सोय झालीय बरं का ! पुण्यात बाईक चालवायला जबरी मजा येते .

पुणेकरांचे आवडीचे पूर्वीचे वाहन म्हणजे सायकल. आपल्या गावात देवाला सोडलेल्या रेड्याला जसे कोणीही काहीही करत नाहीत, तसेच इथे सायकलस्वारांना कोणताही नियम लागू नाही. पोलिसांची नजर चुकवून आणि शिट्टीचा इशारा ऐकून न ऐकल्यासारखे करून हे झक्कासपैकी पसार होतात. काय करणार ! सध्याचे लाइफच धावपळीचे झाले आहे . त्यांचा दोष कसा गं म्हणता येईल आई ?

इथल्या दुचाकीचालकांना ऊर्जाबचतीचे महत्त्व खूपच पटले आहे. त्यांच्या वाहनावरसुद्धा तीन जण आरामात बसतात. सिग्नलपाशी लाल दिवा असला तरी ते सहसा थांबत नाहीत; कारण त्यामुळे पेट्रोल जास्त जळते . मी कुठेसे वाचले , की वळताना हात दाखवायचा, तर चौदा स्नायू वापरावे लागतात म्हणे. म्हणून हात दाखवायचे कष्ट कोणी घेत नाहीत. शिवाय हात दाखवून अवलक्षण करू नये म्हणतात. त्यामुळेच की काय काही रिक्षाचालक पायाने वळण्याचा इशारा करतात .

बाबा, तुमच्याप्रमाणे पुणेकरांनाही मराठीचे जबरदस्त प्रेम आहे हं ! त्यामुळे छे एपीीूं , झ१ , झ२, छे झरीज्ञळपस असले इंग्रजी भाषेतले फलक खरा पुणेकर अजिबात वाचत नाही . इथे सहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना तीन आसनी रिक्षा म्हणतात आणि दहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना सहा आसनी रिक्षा म्हणतात . आहे ना गंमत ? शाळांचे रिक्षावाले काका खूप प्रेमळ असतात . रिक्षात १२-१५ मुले घेऊन ते मायेची भूक कशीबशी भागवितात . आई, पुणेकर फार लठ्ठ होऊ लागलेत असा अहवाल मध्यंतरी तू वाचला असशीलच. त्यावर उपाय म्हणून रिक्षावाले फक्त लांब अंतरावरचे प्रवासी स्वीकारतात . बसचालकांनाही पुणेकरांच्या लठ्ठपणाची खूप काळजी वाटते. त्यामुळे ते स्टॉपच्या अलीकडे किंवा पलीकडेच बस थांबवितात.

बाबा, येथील वाहतूक पोलिस पर्यावरणाबाबत सजग आहेत. एक कागद बनविण्यासाठी अनेक झाडे तोडावी लागतात. त्यामुळे नियम तोडणाऱ्याला कागदाची पावती फाडून दंड करणे ते गुन्हाच समजतात . मध्यंतरीच्या वादामुळे मोटारचालकांचा "लेन' या शब्दावर खूप राग आहे . "लेनची शिस्त पाळा' असा फलक वाचला, की ते हटकून ती सूचना धुडकावतात . बाबा, दुसरी आनंदाची बातमी म्हणजे मला लायसन्स अगदी होस्टेलपोच मिळाले. कसे ते मात्र गावाला आलो की सांगेन!

( ता.क. - बंटीला मोकळ्या मैदानात सायकल शिकवू नका. मे महिन्यात मी त्याला कर्वे रस्त्यावर दोन दिवसांत शिकवेन.)

तुमचा लाडका बंड्या

Friday, May 04, 2007

संटा बंटाचे आमंत्रण

संटा आणि बंटा ३० मजली इमारतीमध्ये रहात असतात. संटा ३०च्या मजल्यावर रहात असतो आणि बंटा ग्राऊंड फ्लोअरवर. एकदा संटाला बंटाची खोडी कढायची हुक्की येते म्हणून तो बंटाला त्याच्याकडे ३०च्या मजल्यावर जेवायला बोलावतो आणि लिफ्ट बंद करुन ठेवतो..., वर स्वत:च्या घराला बाहेरुन कुलूप लाऊन बसतो. बंटा आपला लिफ्ट बंद म्हणून जिने चढत वर येतो आणि बघतो तर घराला कुलूप.... त्याला कळते की त्याला संटाने गंडवले आहे.

दुसऱ्या दिवशी बंटा म्हणतो की आपण पण संटाला असेच गंडवावे म्हणून तो संटाला त्याच्याकडे जेवायला बोलावतो आणि घराला कुलूप लाउन ठेवतो. संटा येतो आणि बघतो तर कुलूप. त्याला कळते की बंटाने पण त्याला ऊल्लू बनावले आहे. तो बंटाच्या घरावर चिठ्ठी लावतो "मै यहा आयाईच नही"..!!!

आमंत्रण

संटा (त्याच्या गर्लफ्रेंडला फोनवर) : आज दोपहर घर कोई नही है...!

संटाची गर्लफ्रेंड दुपारी त्याच्या घरी जाते तर घरी खरोखरचं कोणी नसते (संटा पण नसतो)...!!!

Thursday, April 26, 2007

बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम

एक बाई डॉक्टरांकडे जातात....
डॉक्टर: काय झाले आहे काकू तुम्हाला...?
काकू: मला बद्धकोष्ठता (काँस्टीपेशन) आहे.
डॉक्टर: त्यासाठी काही करता का...?
काकू: करते ना... मी रोज ३-४ तास संडासात बसते..
डॉक्टर: तसे नाही हो... तसे नव्हते म्हणायचे मला.. म्हणजे तुम्ही काही घेता का...?
काकू: हो.. घेते ना.. विणकाम घेते बरोबर..!!!

ऍशचा उखाणा

सलमान आणि विवेकला लग्नाचे दिले होते वचन
दोघांना टांग देऊन धरला अभिषेक बच्चन

शगुनाच्या मिठाईला चांदीचे कव्हर
अभिषेकरावांचे नाव घेते सलमान-विवेकची लव्हर...!

Tuesday, February 13, 2007

अकबराचा जन्म

गुरुजी: अकबराचा जन्म आणि मृत्यू केंव्हा झाला...?
चिंटू: माहित नाही गुरुजी..
गुरुजी: अरे असे काय करतोस..? पुस्तकामध्ये लिहीले आहे की ... १५४२-१६०५
चिंटू: मला वाटले की तो अकबराचा मोबाईल नंबर आहे...!!!

Friday, February 09, 2007

राणी मुखर्जी शाहरुख खान आणि पोळ्या

राणी मुखर्जी शाहरुख खानच्या पाठीवर पोळ्या का भाजते...?
कारण: शाहरुख खान म्हणतो.... 'मीतवा.....' (मी तवा...!!!)

Friday, January 26, 2007

टेस्टी तंदूरी चिकन

तंदूरी चिकनवर आडवा हात मारत संता बायकोला म्हणाला, ''ओय कुलविंदर, आज चिकन तो बहुत टेस्टी है... स्पेशल मसाला लावलास की काय?''
कुलविंदर म्हणाली, ''काही खास नाही हो, तंदूरमध्ये कोंबडी जरा जास्त भाजली गेली म्हणून तिला बरनॉल लावलंय थोडंसं!!!''

सिनेमाची तिकीटं

विन्या प्रधान शनिवारी संध्याकाळी घरी आला. बॅग टाकून सोफ्यावर रेलत बायकोला म्हणाला, ''वॉव! उद्या संडे! मी उद्या मस्त एन्जॉय करणार. ही पाहा सिनेमाची तिकीटं.''
त्याच्या हातातली सिनेमाची तिकिटं घेऊन बायकोनं विचारलं, ''पण तीन तिकीटं कुणासाठी?''
'' तू आणि तुझ्या आई-बाबांसाठी!!!!''

५०० वर्षांपूवीर्चा ग्लास

' खळ्ळ्ळ्ळ्'... आवाज झाला. म्युझियमचे संचालक त्वरेनं आवाजाच्या दिशेनं धावले. काचेचे तुकडे गोळा करत असलेल्या संतावर ते जीव खाऊन ओरडले, ''अहो, तुम्ही ५०० वर्षांपूवीर्चा ग्लास तोडलाय!''
संता म्हणाला, ''शुकर है भगवान का! मला वाटलं नवा होता की काय!!!!!''

मिस्टर किरकिरे

डॉक्टर : बरेच दिवसांत तुम्ही भेटला नाहीत मिस्टर किरकिरे.
किरकिरे : काय करणार डॉक्टर. जरा तब्येत बरी नव्हती!!!

हायजॅक

विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, ''हाय जॅक!''
... तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...
... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ''हाय टॉम!!!!!''

ट्रॅफिक पोलिसमामा आणि बंता

घोड्यावरून सुसाट दौडत निघालेल्या बंताला रस्त्यावरचा लाल दिवा काही दिसला नाही. सिग्नल तोडून तो भरधाव पुढे निघाला. पाठोपाठ ट्रॅफिक पोलिसमामाची शिटी वाजली.
बंतानं मागे वळून धावत्या घोड्याची शेपटी उचलली आणि तो खदाखदा हसत मामाला म्हणाला, ''घे लेका नंबर टिपून!!!!''

Wednesday, November 15, 2006

एकान्तवास

किती ही गर्दी
किती ही गडबड
झालायं नुसता त्रास
अशाचं वेळी हवासा वाटतो
एकान्तवास....!!!


एकान्त आणि वास....
दोन्ही मिळे हमखास..
अशी एकच जागा खास...
ती म्हणजे ........ संडास...!!!