Saturday, August 12, 2006

राम शाम आणि गुरूजी

रामः अरे शाम, तुला जपानी बोलता येते काय..?
शामः हो येते ना..
रामः बोलून दाखव बरे..
शामः जपानी...!


गुरूजीः मुलांनो, तुम्हाला भुतांची गोष्ट सांगू का आज...?
मुलेः नको गुरूजी, बांग्लादेशाची सांगा...!!!

Friday, August 11, 2006

गाईड मधली वहीदा रेहमानची साडी

गाईड चित्रपटामध्ये 'गाता रहे मेरा दिल' ह्या गाण्यामध्ये वहीदा रेहमान एकदा पण 'सारी' (मराठीः साडी) बदलत का नाही...?
उत्तरः कारण देव आनंद तिला सांगतो "बदले दुनिया 'सारी', तुम ना बदलना"...!

वाळवंट पी.जे.

एक मुलगा आणि त्याची छावी (सभ्य भाषेत प्रेयसी) असेच एकदा गप्पा मारत (एकमेकांना) डोळ्यात डोळे घालून जिन्यामध्ये बसले असतात. त्यांना काहीच भान रहात नाही. थोड्या वेळाने बघतात तर काय... त्यांच्या आजूबाजूला सगळे वाळवंट असते... कसे काय..?

उत्तरः आखों ही आखोंमे इशारा हो गया, बैठे बैठे 'जिने'का 'सहारा' हो गया.

Thursday, August 03, 2006

राम आणि रावण

असे काय आहे की जे रावण करू शकतो आणि राम करू शकत नाही..?
रावण एकटा कोरस मध्ये गाणे गाऊ शकतो.


असे काय आहे की जे राम करू शकतो आणि रावण करू शकत नाही..?
राम टी-शर्ट घालू शकतो, राम एका कुशीवर झोपू शकतो.

सहा वर्षाच्या मुलाने केला विनयभंग



See This news... Posted by Picasa

Wednesday, August 02, 2006

झाड

रामः अरे शाम, ते बघ ते झाड...
शामः माझ्याकडे कुंचा नाही आहे, तुचं झाड...!

पुणे तिथे काय उणे!

काही वर्षां पुर्वी राम नवमीला, एका मंदिरात (पुण्याच्याच) एक पाटी वाचल्याचे आठवले.
"काही अपरिहार्य कारणास्तव राम जन्म दु. १२ ऐवजी दु. ३ वाजता होइल"

बादशाहीत पूर्वी म्हणे अशी पाटी होती....

बशी मधे सिगारेट विझवू नये अन्यथा ash tray मधे चहा देण्यात येईल

नारायणपेठेजवळ दिवाळीत खालील पाटी वाचली-
"येथे फुसक्या फटाक्यांना वाती लावून मिळतील !!"

हा घ्या पुरावा



From: Manogat.com

Tuesday, August 01, 2006

चारोळी

कालच्या मारामारी नंतर...
आता मी कवळीच वापरतो.
कोणाला शंका येऊ नये म्हणून...
चड्डी देखील मी पिवळीच वापरतो.

- सागरेश्वर

काळे पांढरे

मिस के.स.काळे यांचे लग्न मि. सुंदर पिकले बरोबर होते आणि अचानक तिचे सगळे केस पांढरे का होतात..?

उत्तरः के.स.काळे लग्नानंतर के.स. पिकले होतात ना...!